पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे
मागच्या काही दिवसात मी सलग १५ दिवस कॅम्पसाईट व वेल्ह्याच्या मावळ पट्ट्यात कामानिमित्त मुक्कामी होतो. कॅम्पसाईटवर नवीन शौचालये, एक बहुउद्देशीय हॉल, व स्वयंपाक खोली बांधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. इतके दिवस मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप शिवाय घालवणे म्हणजे निसर्गशाळी एकरुप होण्याची एक संधीच होती. गवंडी बिगारी यांच्या सोबतीने पडेल काम करीत मुक्कामीच होतो तिकडे….