आमच्या उनाडक्या, मद्यधुंद ठाकर, त्रासदायक किडे व समुद्रकिना-यावरील स्वच्छंदी रात्र
रम्य त्या आठवणी आमचाच नव्हे तर आपणा प्रत्येकाच्याच भुतकाळातील काही भाग आपणास, प्रत्येकास रम्य वाटतो. आपणास आपला तो तो भुतकाळ पुनःपुन्हा जगावासा वाटतो, हवाहवासा वाटतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही वर्षे असतात जेव्हा आपण ख-या अर्थाने जगलेलो असतो, असे आपणास आत्ता वाटते. त्या काळातील आपले ते जगणे, आपल्या वर्तमान काळात देखील आपणास जगण्याची आणि ख-या…