गोसावी किडा, प्रणय बाग आणि ध्येयहिन उत्क्रांतीवाद
शनिवारी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या परीसरामध्ये, मृगाचा किडा पाहिला. मागच्या वर्षी देखील याच अवधीमध्ये किडा दिसला होता. त्यावेळी याविषयी थोडे वाचले देखील होते. यावर्षी मात्र, मृगाचा किडा पाहताना, ते वाचलेले सर्व आठवले व एक वेगळाच विचार मनात येऊन गेला. आता थोडा थोडा आठवुन इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. डार्विन ने उत्क्रांतीवाद मांडला. सुरुवातीस पृथ्वीवर एक पेशी असलेला जीव…