आकाशातील चित्तरकथा – खगोलशास्त्र म्हणजे काय व कशासाठी?
जीवन जगताना संघर्ष या पृथ्वीतलावरील सर्वच प्राण्यांच्या वाट्याला आलेला आहे. जंगली प्राण्यांच्या बाबतीत हा संघर्ष त्यांचे अस्तित्व वर्तमानात टिकवण्यासाठी असतो. अगदी याच प्रमाणे कधी काळी मनुष्य “प्राण्याचा” संघर्ष देखील वर्तमानामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठीचा होता. जिवंत राहण्यासाठी स्पर्धा करावी लागत होतीच, पण ती स्पर्धा मनुष्या-मनुष्या मध्ये कमी होती व इतर प्राण्यांच्या सोबत जास्त होती. कधी बचाव तर…