पदभ्रमण आणि किल्ल्यांवरील मुक्कामांचे विधिनिषेध
१९९४ मध्ये सुरु झालेले आमचे ट्रेकिंग आणि गडकिल्ले भटकंतीला आपोआपच आळा बसला, जेव्हा मी आय टी क्षेत्रामध्ये गेलो. सन २००२ पर्यंत छोटे छोटे ट्रेक तरी करीत असायचो कधी मित्रांसोबत तर कधी विद्यार्थ्यांसोबत. पण नंतर मात्र अजिबातच जमले नाही. करीयरच्या ओघामध्ये गडवाटा जणु अनोळखीच झाल्या. त्यानंतर २०१२ मध्ये एकदा, टेकमहिंद्रा मध्ये नोकरीत असताना हरिश्चंद्र गड करण्याचा…