काट्या-कुट्यांची शाळा; निसर्गाची शाळा !
शनिवारची सकाळ शाळा असायची व शाळेतुन घरी आले की गाय व तिची दोन वासरांना घेऊन रानांत त्यांना चारावयास नेणे हा माझ्यासाठी एक सक्तीचा कार्यक्रम होता. शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असुन ही कधी त्या सुट्टीची मजा घेता येत नसायची. आणि मजा म्हणजे काय तर टिव्ही पाहणे किंवा पोरांसोरांसोबत गावभर हिंडणे. आम्ही जास्त वेळ टीव्ही पाहिलेले माझ्या…