कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग ३
मी कोकणदिवा, स्वराज्याचा साक्षीदार आणि रक्षक! खिंड लढवायला पुन्हा निघालेले जिवाजी आणि त्याचे नऊ साथीदार, एवढ्या बिकट प्रसंगामध्ये देखील, त्या घासभर चटणी भाकरी व माझ्या कड्यातील थंडगार पाण्याने पुनश्चः ताजेतवाने होऊन आपापला मोर्चा सांभाळायला निघाले. एव्हाना सकाळच्या प्रहर संपण्याकडे आला होता. ऊन मी म्हणत होते. जिवाजीच्या टोळीतील एकाचे नाव हरजी टोळकर. जिवाजीचे व बाकीच्या आठ…