ग्रीष्माच्या झळा आणि वळवाच्या पर्जन्यधारांतील रतनगड घनचक्कर – २००१
गिरिप्रेमीने नुकताच कातराबाईचा कडा प्रस्तरारोहन करुन सर केला. यशदिप देखील या मोहीमेमध्ये सहभागी होता. या प्रस्तरारोहण मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण करण्यात आले होते. व यथावकाश सर्व आरोहकांचे कौतुक करण्याचा कार्यक्रम सोहळा झाला व त्यामध्ये या मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण/ फिल्म दाखवण्यात आली. कातराकडा आणि सह्याद्रीतील एकुणच सगळेच कडे कसे आडदाम्ड, उभे-आडवे विस्तारलेले, सरळसोट, रौद्र, भयावह आहेत याचे…