लख लख चंदेरी
आम्ही अगदी निशब्द बसुन राहिलो. कुणाचा ही कसलाही आवाज येईनासा झाला होता. अगदीच कुणी थोड उशिरा आल असेल तर त्यांच्या पायाखाली येणा-या, वाळलेल्या पानांचा तेवढा कर-कर असा आवाज येत होता. बसलेल्या लोकांना न बोलण्याच्या आणि टॉर्च न लावण्याच्या सुचना जरी दिल्या होत्या तरी त्या सुचनांपेक्षा समोरचे अलौकिक असे दृश्य पाहुनच सगळेच निशब्द झाले होते. अगदी…